पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आज कोणालाही काही माहिती नसतांना भुसावळ येथून काही अधिकारी व कर्मचारी यांनी पी. जे. रेल्वे स्टेशन येथील पी.जे.चे सामान काढण्याचे काम सुरू केले. ते सामान घेऊन जात असतांना तेथे बचाव कृती समितीने धडक देऊन सदर सामान हलवण्याच्या कामास विरोध केला.
तात्काळ जळगाव विभागाचे खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर माहिती त्यांना देत ‘हे काम तात्काळ थांबले पाहिजे’ अशी त्यांना विनंती केली. खासदार उन्मेष पाटील यांनी भुसावळ डी.आर.एम.केडिया यांच्याशी चर्चा करून सदर काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले व पाचोरा येथील सामान ऊचलण्याचे काम बंद झाले.
“येत्या काही दिवसात दिल्ली येथे रेल्वे बोर्ड चेअरमन व जनरल मॅनेजर तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत पी.जे.बचाव कृती समिती पाचोरा यांची संयुक्त बैठक लवकरच घेणार आहे. असे पत्र संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहे.” असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.
पी.जे.रेल्वे स्टेशनवर यावेळी पी.जे.बचाव कृती समिती अध्यक्ष अनिल देशमुख, कार्याध्यक्ष अॅड.अविनाश भालेराव, खजिनदार पप्पू राजपूत, प्रा.मनिष बाविस्कर, भरत खंडेलवाल, सुनील शिंदे, संजय जडे, अनिल (आबा) येवले, प्रा.गणेश पाटील, रणजीत पाटील, राजू पाटील सह बचाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.