पी. जी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनानिमित्त मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ईच्या पी. जी. महाविद्यालयात, सूक्ष्मजीवशास्त्र  विभागातील विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.  एस.  झोपे , सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीचे प्रादेशिक समन्वयक प्रा. संदीप पाटील, उपस्थित होते. हा कार्यक्रम सूक्ष्मजीवशास्त्र व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सूक्ष्मजीवशास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

विषाणूजन्य आजार या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढून डेंग्यू ,एच आय व्ही एड्स ,पोलिओ  सारख्या संसर्गजन्य विषाणूंचे  बद्दल जनजागृती केली.  आरोग्यासाठी हितकारक सूक्ष्मजीवरहित  फर्मेंटेड फूड फेस्टिवल  आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध अमावलेले खाद्यपदार्थ बनवून त्यांचे आरोग्यास होणारे हितकारक फायदे सांगितले.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्पर्धेचा नोंदवला. प्राचार्य. झोपे यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रा.दीक्षा सातपुते व गणेश माळी यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी मार्गदर्शनव सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.  रंगोली स्पर्धा प्रथम पारितोषिक  विभागून ऐश्वर्या महाजन व रागिनी पाटील तर द्वितीय गायत्री जाधव यांना देण्यात आले .फर्मेंटेड फूड फेस्टिवल मध्ये प्रथम तेजल अत्तर दे तर द्वितीय पारितोषिक ऋतुजा राजपूत  हिने पटकावले.

Protected Content