पी. डी. पाटलांचा आ. मंगेश चव्हाण यांच्या शुभहस्ते “मानपत्र” देऊन गौरव

धरणगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगांव शहरातील महात्मा फुले हायस्कूल शाळेचे आदर्श शिक्षक पी डी पाटील यांचा जन्मभूमी मांदुर्णे गावाच्या वतीने “मानपत्र ” देऊन सन्मान करण्यात आला. मांदुर्णे गावाच्या भूमिपूजन आणि ग्रामपंचायतच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी चाळीसगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मांदूर्णे गावातील कला, शिक्षण, क्रीडा व वैद्यकीय क्षेत्र यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या मांदुर्णे गावातील रत्नांचा आमदार महोदय यांच्या हस्ते विशेष “मानपत्र ” देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये शिक्षण क्षेत्रात मागील काळात पी डी पाटील यांना राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे एकूण ११ पुरस्कार मिळाले होते या सोबतच पाटील यांनी व्याख्यान, पुस्तक लेखन व सत्यशोधक पुस्तक चळवळ सुरू करून महापुरुषांचे विचार घरा-घरापर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले असून पाटील यांची सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आमच्या भूमिपुत्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

चाळीसगाव विधानसभेचे लाडके आमदार मंगेश चव्हाण, मांदुर्णे गावाचे सरपंच सौ.सुनंदाबाई दगडू पाटील, मार्गदर्शक दगडू गणपत पाटील, उपसरपंच गोरख आत्माराम पाटील व सर्व सन्माननीय ग्रामस्थांच्या वतीने ” मानपत्र ” देऊन गौरव करण्यात आला. माझ्या मातीने – माझ्या गावाने केलेला माझा हा गौरव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. पुरस्काराने ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा घेऊन मी सतत माझे शैक्षणिक – सामाजिक काम करत राहील असे प्रतिपादन करून पाटील यांनी गावाचे सरपंच व सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन – आयोजन करणारे आबासाहेब दीपक पाटील एपीआय यांच्या संकल्पनेतून हा अविस्मरणीय सोहळा मला अनुभवण्याचा योग आला म्हणून पाटील यांनी आबासाहेबांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी धर्मराज पुंडलिक पाटील, दगडू उत्तम पाटील, जयपाल भास्कर बाविस्कर, महेश भावसार, राजेंद्र पाटील तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content