भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर दहावीच्या विद्यार्थ्यांकडून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी १७ वर्षीय मुलावर पोक्सो कायद्यांर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावात ३ वर्षीय चिमुकली आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील राहणारा १७ वर्षीय मुलाने पिडीत मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेत लैंगिक अत्याचार केल्याची उघडकीला आले आहे. पिडीत मुलगी घरी रडत आल्यानंतर तिने आईला हा प्रकार सांगितली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने भडगाव पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी विधीसंघर्षीत मुलावर पोलीसात गुन्हा दाखल करून घेतला. या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करत आहेत.