जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका महिलेने पैसे मागितल्याच्या कारणावरून त्यांच्या सासऱ्यांनी अश्लिल चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना सोमवारी १४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १५ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. सोमवारी १४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता महिलेने त्यांचे सासरे यांना ठरल्याप्रमाणे पैसे द्यावी अशी मागणी केली. त्याचा राग आल्याने महिलेचे सासरे यांनी महिलेसोबत अश्लिल चाळे करून त्यांचा विनयभंग केला. तसचे अश्लिल शिवीगाळ करत महिलेच्या अंगाला स्पर्श करून त्यांचा विनयभंग केला. हा घाणेरडा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सासऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहे.




