Home क्राईम गोलाणी मार्केट येथून जनरेटर टेम्पोची चोरी !

गोलाणी मार्केट येथून जनरेटर टेम्पोची चोरी !

0
176

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरातून एका जनरेटर टेम्पोची चोरी झाल्याची घटना मंगळवार, १५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली आहे. मायटी ब्रदर्स दुकानासमोर पार्किंगला लावलेला हा जनरेटर टेम्पो अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला. याबाबत रात्री ९.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद मुकुंद थत्ते (वय ४३, रा. नवीपेठ, जळगाव) यांचा जनरेटर टेम्पो क्रमांक (एमएच १९ एस ०६६६) गोलाणी मार्केट येथील मायटी ब्रदर्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत लावलेला होता. १४ जुलै ते १५ जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा टेम्पो, जनरेटरसहित चोरून नेला. सकाळी ९.३० वाजता हा प्रकार थत्ते यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने वाहनाचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर, रात्री उशिरा त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound