अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नंदुरबार जिल्ह्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नानंतर अमळनेर तालुक्यातील ढेकूतांडा येथे झालेल्या अत्याचारातून तिने मुलीला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे१ एप्रिल २०२४ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकू तांडा येथील २७ वर्षीय तरुणाशी लग्न झाले. पीडित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून तिने एका मुलीला जन्म दिला. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, रविवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अमळनेर पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बारेकर करीत आहेत.