भडगाव प्रतिनिधी ।“संघटनेचे पद शोभेची वस्तु नाहि, खरोखर मनापासून संघटनेचे काम करण्याची ईच्छा असेल तर पदे घ्या अन्यथा आपली पदे सोडा” असा सज्जड ईशारा आ.किशोर पाटील यांनी आज येथे आयोजित तालुका युवासेनेच्या आढावा बैठकीत बोलतांना दिला.
तालुक्यात भविष्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणूका लक्षात घेऊन आमदार किशोर पाटील यांनी कार्यकर्ते आणि संघटना बांधनी कडे स्वतः लक्ष घातले आहे.त्या उद्देशाने त्यांनी आज भडगांव येथील “शिवतिर्थ” शिवसेना कार्यालयात तालुका व शहर युवासेनेच्या कार्यकर्त्यांची बैठकिचे आयोजन केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि आज कुठल्याही निवडणूकित युवकांचे फार मोठे योगदान असते जे युवक करु शकता ते दुसरे कोणी करु शकत नाहि, आणि त्या उद्देशानेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेबांनी ना.अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेची स्थापना केली आहे. परंतु आपल्या तालुक्यातील गत काळातील गेल्या काही निवडणूकांमध्ये युवासेनेचा पाहिजे तसा प्रभाव युवासेना कार्यकर्ते दाखऊ शकलेले नाहि. म्हणून ज्या युवासेनेच्या पदाधिकार्यांना संघटनेसाठी काम करण्यासाठी वेळ नाहि त्यांनी स्वतः राजीनामा देऊन होतकरु कार्यकर्त्यांना संधी द्या. असेही त्यांनी बोलतांना सांगितले .
या प्रसंगी पाचोरा येथील गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी,यांनीही आपल्या भाषणातून संघटने संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन केले प्रास्ताविक जे.के.पाटील यांनी केले.सदर बैठकि प्रसंगी व्यासपिठावर आमदार किशोरअप्पा पाटील,उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, तालुका प्रमुख डाॕ.विलास पाटील, संजय पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, शहर प्रमुख योगेश गंजे, पाचोरा येथील किशोर बारावकर, गणेश पाटील, रतन परदेशी, प्रथम नगराध्यक्ष शशीकांत येवले, युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील, शहर प्रमुख निलेशा पाटील आणि भडगांव शहर आणि तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.