….अन्यथा मोठा अनर्थ झाला असता; जानकी नगरात सिलेंडरच्या स्फोटात एक ठार तर एक जखमी (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील जानकी नगरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने स्वयंपाकी करणारा आचारी जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, “जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील जानकी नगरात बंशीलाल पांडे (वय 55) रा. जानकी नगर जळगाव येथे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आचारीचे काम करत असतात. मंगळवार 8 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कमर्शियल गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये बन्सीलाल पांडे हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले बालकिसन गणेशलाल जोशी हे गंभीर जखमी झाले. जखमीस तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

 

जानकी नगर या भागात पार्टिशनची घरे व दाट वस्ती असल्यामुळे घराला घर लागून आहेत. या सिलेंडर जवळ अजून काही सिलेंडर होती. ती शेजारील तरुणानी बाहेर नेली नसती आणि वेळीच आग आटोक्यात आली नसती. तर मोठा अनर्थ घडला असता मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग वेळीच आटोक्यात आली. घटनेच्या पंचनाम्याचे काम सुरु होते.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन हे आग आटोक्यात आणली. दरम्यान या स्वयंपाकाच्या ठिकाणी बाजूला असलेल्या 8 ते 10 सिलेंडर अजून होते. सुदैवाने काही गल्लीतील नागरिकांच्या मदतीने हे सिलेंडर बाजुला करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4852842424782365

 

Protected Content