जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गारखेडा येथे ‘रामराज्य क्रिकेट क्लब’ आयोजित ‘टेनिस बॉल स्पर्धे’चे राष्ट्रवादी नेते संजय गरुड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ‘तरुणांनी शरीर सदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत’ असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘गारखेडा’ येथे ‘रामराज्य क्रिकेट क्लब’तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे नेते संजय गरुड व राष्ट्रवादी विजय एन.टी.सेल. जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष राजू नाईक, शहराध्यक्ष पप्पू पाटील, शाहिद शेख, इम्रान भाई, समीर भाई, चरण बेलदार, कृष्णा जाधव, मोहन चौधरी, अमोल पाटील, पराग नेरकर, भुषण पाटील, गोपाल जाधव आदी उपस्थित होते.
आपल्या वक्तव्याने राजकीय मैदान गाजवणारे संजय गरुड यांनी क्रिकेटच्या मैदानावरही आपली चुणूक दाखवत फलंदाजी केली. यासह “क्रिकेटच्या माध्यमातून युवकांनी मैदानी खेळ खेळावेत. त्याचबरोबर आपल्या शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी व्यसनापासून दूर राहावे. त्यामुळे आपला आदर्श घेत येणारी पिढी चांगल्या प्रकारे घडेल.” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं.
गारखेडा येथे भरवण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण ३२ क्रिकेट संघानी सहभाग घेतला असून विजेत्या संघाला अकरा हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक तर पाच हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहे.