विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या ४४ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचे २६ व २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या या संघटनेच्या दोनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २६) रोजी सकाळी ११ वाजता महावितरणचे संचालक (वित्त) रवींद्र सावंत यांच्या हस्ते होईल. महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात कंपनी व संघटनेसमोरील वाटचाल व आव्हाने, प्रस्तावित धोरणे व कायदे आदींवर विचारमंथन होणार आहे. तसेच ध्येयधोरणांसंदर्भात ठराव व चर्चा, पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा, कार्यशाळा, केंद्रीय कार्यकारीणी निवडणूक कार्यक्रम होणार आहे. आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक, पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, संघटनेचे सरचिटणीस मनोज ठवरे, संघटन सचिव संजय खाडे, पुणे-बारामती परिमंडलाचे अध्यक्ष संजय चव्हाण, कार्याध्यक्ष विजय गुळदगड, सचिव सतीश फडतरे, विविध आयोजन समित्या, पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

 

 

Protected Content