जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगाव कार्यालयाचे वतीने शुक्रवार, दि 15 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) मेस हॉल, जळगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 474 रिक्तपदांची मागणी अधिसूचित केलेली आहेत. रिक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/ 12 वी पास आय टि आय. डिप्लोमा धारक आणि इतर सर्व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
उदयोजकाना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने आपण स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित राहावे. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांची नांव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागांच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनबलाईन नांव नोंदणी करावी. उमेदवारांनी ऑन लाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधाचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येईल.
अल्पसंख्याक उमेदवारांनी देखील आयोजित करण्यांत आलेल्या मेळाव्याचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या. 6.15 या वेळेत दूरध्वनी क्रमांक 0257- 2959790 वर संपर्क साधावा. आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगांवचे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.