परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘जागतिक परिचारिका दिना’च्या पूर्वसंध्येला शासकीय परिचारिका महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

परिचारिका महाविद्यालयाच्या सांकृतिक कार्यक्रमात एकल नृत्य, सामुहिक नृत्य व गीत गायनाने रंगत आणली. या कार्यक्रमात महापौर जयश्री महाजन यांनी कोरोना काळात केलेल्या सेवेसह, तात्काळ रुग्णसेवेसाठी तत्पर राहणाऱ्या गुणाचे कौतुक करत परिचारिकांच्या कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदीप पाटील, अधिसेविका प्रणिता गायकवाड, अनिता भालेराव, निता भोळे, विवेक भालेराव, कविता नेतकर, महेंद्र वळवी, अर्चना भास्कर, अनिता करोसिया आदींची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/733537184468199

Protected Content