जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठ येथे जळगाव होलसेल रेडीमेड होजीअरी व कपडा असोसिएशनच्या वतीने गणतंत्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात करण्यात आली. यावेळी असोशिएशन अध्यक्ष राजेश जेवलानी यांच्याहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी 90 लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला अध्य्क्ष राजेश जेवलानी, उपाध्यक्ष प्रकाश नागदेव, राजेश थोरानी, मनोज साहित्या, सागर मंधवानी , दीपक मंधवानी, सुशील तलरेजा, धीरज मताणी, रवि लेखवानी, संजय नाथानी, जोगेंद्र जाधवानी,डॉ जितेंद्र शाह यांच्यासह आदी उपस्थित होते.