जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी भाजपच्या वतीने मंगळवार, दि. १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे करणार आहे.
जळगाव जिल्ह्यात अतिकडच्या काळात शेतकऱ्यांना नियमानुसार ८ आठ वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना वेळेवर वीजपुरवठा करावा अशी मागणी वारंवार केली गेली परंतू याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपूवी खासदार उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी भेट घेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना अखंडीत ८ तास वीजपुरवठा करावा, जळगाव शहरासह इतर ठिकाणीचे रस्त्यांच्या समस्या सोडविण्यात यावे. या मागण्यांसाठी मंगळवार १२ एप्रिल रोजी माजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाला जिल्ह्यातील शेतकरी, भाजपाचे नेते, भाजपचे जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, आमदार मंगेश चव्हाण आदींनी केले आहे.