यावल येथे कोळी समाज बांधवाच्या बैठकीचे आयोजन

यावल प्रतिनिधी ।  सर्व अन्याय ग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधवाची माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनाबाबत महत्वाची बैठक  जिनींग प्रेसिंग सभागृहात दि. २१ नोव्हेंबर रोजी शनिवारी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  अँड़. गणेश सोनवणे संयोजक, यावल तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते  प्रभाकरआप्पा सोनवणे , प्रल्हाद सोनवणे उत्तर विभागीय उपाध्यक्ष मंगल  कोळी जि अध्यक्ष कर्मचारी संघटना, प्रशांत सोनवणे जिल्हा युवक आघाडी सुनीताताई कोळी महिला आघाडी यांच्या प्रमुख उपस्तितीत आयोजीत करण्यात  आली आहे.

तरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त मोठया संख्येने समाजातील तरुण बांधवानी व कर्मचारी  वर्गानी तसेच जेष्ठ श्रेष्ठ समाज बांधवानी या बैठकीस उपस्तित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते

भरत कोळी यावल, आकाश कोळी, गोकुळ कोळी मनवेल, किरण कोळी दहिगाव, अमोल कोळी यावल, अनील कोळी. निमगाव, डिगंबर कोळी, दत्तात्रय नन्नवरे यावल. योगेश कोळी. समाधान सोनवणे थोरगव्हाण ,गजानन कोळी पींप्री, रोहिदास कोळी, गंगाराम तायडे साकळी, जालंदर व्ही कोळी (प्रसिद्धी प्रमुख आदिवासी संघर्ष समिती यावल) यांनी केले आहे.

 

Protected Content