बोहरा सेंटर स्कुलमध्ये योग शिबीराचे आयोजन

aanda svami

 

पारोळा प्रतिनिधी । शहरातील बोहरा सेंटर स्कुलमध्ये 5 दिवसांसाठी योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य विद्वान युवा संन्यासी पूज्य स्वामी आनंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोहरा सेंटर स्कुलमध्ये दि. 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान योग शिबीर घेण्यात येत असून सकाळी 5 ते 7 वाजता योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य विद्वान युवा संन्यासी पूज्य स्वामी आनंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग शिबिरात प्रशिक्षण निशुल्क असून वैद्यकीय सल्ला, ॲक्युप्रेशर उपचार, सार्वजनिक विश्वशांती यज्ञ, हवंन, निशुल्क आरोग्य तपासणी आदी सुविधा निशुल्क देण्यात येणार आहेत. तरी योग प्रेमींनी योग शिबिरास यावे, असे आवाहन पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान युवा भारत पतंजली आणि बोहरा सेंट्रल स्कूलच्या वतीने देण्यात आले आहे.

Protected Content