अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 18 डिसेंबर रोजी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

 

जळगाव (प्रतिनिधी) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव यांचेमार्फत जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी इकरा सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, मेहरूण, जळगाव येथे 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मेळाव्यास मुद्रा बँक योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, अल्पंसख्यांक उमेदवारांसाठी कर्ज योजना, कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादिबाबत तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी अल्पसंख्यांक उमेदवारांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून रोजगाराविषयी तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content