यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात २१ ते २४ मार्च या कालावधीत चार दिवसीय मोफत निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बरेला यांनी केले आहे.
दि.२१ मार्च रोजी आयोजीत राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या वतीने आयोजीत या शिबिराचे उदघाटन रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार असुन, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे भुषविणार आहे. दिप प्रज्वलन चोपडा आमदार लताताई सोनवणे या करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदच्या मावळत्या अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मावळते आरोग, शिक्षण व क्रिडा सभापती रविन्द्र पाटील, मावळत्या पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हाधिकारी डॉ अभीजीत राऊत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , जळगाव शल्यचिकीत्सक डॉ किरण पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भिमाशंकर जमादार हे राहणार आहे.
या राष्ट्रीय आरोग्य अभियानाव्दारे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास जनरल सर्जन डॉ. सुशांत सुपे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. विजय कुरकुरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. मोनिका देसाई, बालरोगतज्ञ डॉ. प्रविण पाटील आणी डॉ. मनोज पाटील, मुतखडा तज्ञ डॉ. प्राची सुरतवाला, जनरल फिजिशन डॉ बाराजी पाचेवर, नितिन विसपुते, अस्थीरोगतज्ञ उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी गरजु रुग्णाची शस्त्रक्रिया ही करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार दि. 21 मार्च पासून हे शिबिर सुरू होत असून 24 मार्च पर्यंत हे शिबीर चालणार आहे. या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी केली जाईल तर दुसऱ्या दिवसापासुन ते चौथ्या दिवसा पर्यंत शस्त्रक्रियेस पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात अपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, हायड्रोसिल, गर्भ पिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, शरीरावर झालेल्या गाठी आदींच्या यशस्वी शस्त्रक्रिया या शिबिरात केल्या जाणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ .बी बी बारेला यांनी पत्रकारांना दिली.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्ण यावल तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आपली नोंदणी करू शकतात, सदर शिबिरास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .बी बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा महाजन, नोडल अधिकारी डॉ. पंकज पाटील , हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ फिरोज तडवी , सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ गौरव भोईटे , साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ स्वाती कवडीवाले, पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ गफ्फार तडवी, न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अभिजित सरोदे यांच्या उपस्थितीत शिबीराची सुत्रे सांभाळणार आहे तेव्हा गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. बी. बी. बारेला, नानासाहेब घोडके, विजय वाढे सह रूग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.