‘महाआवास अभियान- ग्रामीण’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “सर्वासाठी घरे -२०२४” या केंद्र शासनाच्या धोरणा अंतर्गत दिनांक १० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्या करिता ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ राबविण्यांत येत आहे.

जिल्ह्यातील मंत्री,खासदार,आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वांजता शाहु महाराज सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Protected Content