कळमसरे येथे संगितमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

कळमसरे -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भगवंत कृपेने व संतांच्या आशीर्वादाने बुधवार ८ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात गावातील नवसाचा गणपती मंदिर पासून भागवत कथेचे भव्यदिव्य अशी शोभायात्राने होईल. संगीतमय भागवत कथेचे निरूपण प.पू.कृष्णदास महाराज नांदेड (राममंदिर) यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. दैनदिंन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, दुपारी कथा निरूपण,सायंकाळी हरिपाठ,भारुड व रात्री कीर्तन असे कार्यक्रम होतील.

रविवार ८ डिसेंबर रोजी ह.भ.प अतुल महाराज नारणेकर, सोमवार ९ डिसेंबर रोजी ह.भ.प भानुदास महाराज भुसावळकर, मंगळवार १० डिसेंबर रोजी ह.भ.प पंकज महाराज पवार अमरावतीकर , बुधवार ११ डिसेंबर रोजी ह.भ.प अमोल महाराज घुगे अकोला, गुरूवार १२ डिसेंबर रोजी ह.भ.प. लक्ष्मण शास्त्री महाराज खेडी भोकर, शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ह.भ.प. पंकज देशमुख महाराज हिंगोली. ह भ.प चकोर महाराज शास्त्री अकोट शनिवार १४ डिसेंबर रोजी तर रविवार १५ डिसेंबर रोजी ह.भ.प. किशोर महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल. तरी पंचक्रोशीतील समस्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त दत्त मंदिर चौक ग्रामस्थ कळमसरे यांनी केली आहे.

Protected Content