सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या महान पुरुषांना अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले . छात्रध्यापकांनी मशाल घेऊन स्वातंत्र्या च्या घोषणा दिल्या. छात्रध्यापकांनी क्रांतीदिन व आदिवासी दिना निमित्त मनोगत व स्फुरणिय गीते सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सौ. प्रतिभा बोरोले यांनी मशाल प्रज्वलित करून छात्रध्यापकांना सुपुर्द केली . भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू ह्या आदिवासी महिला आहेत ही गौरवाची व अभिमानाची बाब आहे हे आदिवासी दिनाचे औचित्य साधून कथन केले. प्रास्ताविक प्रा. हेमांगी चौधरी यांनी केले. सुत्र संचालन कु. रिया वाघ यांनी केले. आभार दिपाली चौधरी यांनी केले.