जळगाव येथे खेलो इंडिया केआरआयटीआय मूल्यांकन शिबिराचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खेलो इंडिया केआयआरटीआय (खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयटेंडिफिकेशन) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चा एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांच्या उभरत्या खेळाडूंचे मूल्यांकन केले जाणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.यावेळी त्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार असून, क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या बाबतीत चर्चा करतील. खेलो इंडिया केआयआरटीआय कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हा आहे. या शिबिरामुळे जळगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. या शिबिरात विविध क्रीडा प्रकारांसाठी कौशल्ये तपासण्यात येणार आहेत. खेळाडूंच्या व क्रीडा मार्गदर्शकांच्या सहभागाने या शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

Protected Content