फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी फैजपुरात हिंदू संघटना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीची यावल येथील सेवा पाहणारे धीरज भोळे हे ही उपस्थित होते.
प्रशांत जुवेकर हे शुभ दिव्य मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, स्थापनेपासून समितीने अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, पत्रकार-संपादक असे विविध क्षेत्रातील हिंदूंना संघटित करण्याचे कार्य केले आहे. आज जवळजवळ देशभरातील ५०० हुन अधिक हिंदुत्ववादी संघटनाना एका ठिकाणी आणण्याचे, त्यांना हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी दिशा देण्याचे व्यापक कार्य समिती करत आहे. ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या अंतर्गतच येत्या रविवारी, १६ ऑक्टोबर या दिवशी शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५ वाजता हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ता यांच्या बैठकाही आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत, अशी माहिती धीरज भोळे यांनी दिली.