देवगांव देवळी येथे महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देवगांव देवळी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा , महात्मा फुले हायस्कूल, अंगणवाडी कर्मचारी ,बचतगट यांच्या संयुक्त विद्यामाने महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

देवगांव देवळी येथे २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमास स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक मनोहर मोरे, ग्रामसेवक कमलेश निकम, सरपंच सरला पाटील, उपसरपंच संदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, देवळी येथील पोलीस पाटील छोटू मोरे, अविनाश बैसाणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

देवगांव देवळी येथील विद्यार्थी शरद खैरनार यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय संरक्षण मंत्रालयात त्याची निवड झाल्यामुळे त्याचा शाल श्रीफळ देऊन सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व मान्यवर यांनी सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व महात्मा फुले हायस्कूलचे विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांनी गावात प्रभात फेरी काढून स्वच्छता पंधरवडा विषयी जनजागृती केली. तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत देवगांव देवळी, जि.प, शाळा देवगांव देवळी ,म. ज्योतीराव फुले हायस्कूल देवगांव संयुक्तपणे यांनी स्वच्छता जनजागृती सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील देवगाव देवळी, स्वच्छ भारत मिशन कक्ष तालुका अधिकारी मनोहर मोरे,  ग्रामसेवक कमलेश निकम, सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील, उपसरपंच संदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील छोटू मोरे, अविनाश बैसाणे, देवगांव देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे,  देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, सत्कारमूर्ती शरद खैरनार ,देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन, एच.ओ.माळी व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बंधू व भगिनी, बचत गट अंगणवाडीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले.यावेळी एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी, पालक व शिक्षण प्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content