शावैम व जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव सर्जिकल सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे शनिवारी १५ जून रोजी सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शासकीय रुग्णालयात रक्ताचा मोठा तुडवडा जाणवत असतो. या पार्श्वभूमीवर असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडिया च्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रियस्तरावर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुशंगाने जळगांव सर्जिकल सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने हे शिबीर रुग्णालयातील रक्तपेढीत घेण्यात आले आहे. या शिबिरात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे, जळगांव सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्नेहल फेगडे उपस्थित राहणार आहेत. शिबिरात रक्तदान करण्यासाठी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने शिबिराचे समन्वयक सहयोगी प्रा. रोहन पाटील यांनी केले आहे.

Protected Content