जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 114 वा स्थापना दिवसा निमित्त जळगावातील सेंन्ट ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था येथे रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमात 30 व्यक्तींनी रक्तदान केले तर 70 व्यक्तींनी नेत्र तपासणी करून घेतली. यासोबतच मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्या आले. या कार्यक्रमात 30 वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्यासह सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक रमणा मूर्ती, मुख्य प्रबंधक पंकज कुमार आणिअभिषेक नंदेश्वर, प्रणव कुमार झा, सुमित कुमार झा सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेतील कर्मचारी व आर सिटी स्टाफ, संजिवनी मोरे, दिग्विजय खंबायत, सचिन मराठे, अश्विनी मराठे आणि कल्पेश ढिवरे यांनी परिश्रम घेतेले होते. या उपक्रमासाठी काबरा फाउंडेशन, टाटा इन्शुरन्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे सहकार्य मिळाले होते.