जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन येत्या 22 ते 23 जानेवारी, 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातुर, संभाजीनगर, कोल्हापूर व नाशिक असे एकूण आठ विभाग सहभागी होत असुन 17 वर्षे आतील मुलांचे 8 संघ व 17 वर्षे आतील मुलींचे 8 संघ असे एकुण 16 संघांतील एकुण 192 खेळाडू, प्रत्येक संघासोबत 1 व्यावस्थापक व 1 क्रीडा मार्गदर्शक असे एकूण 32 संघ व्यावस्थापक व क्रीडा मार्गदर्शक, 20 पंच व संघटनेचे पदाअधिकारी असे एकूण 250 व्यक्ती यात सहभागी होत आहेत.
या राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दि. 23 जानेवारी, 2025 सांयकाळी 04.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.या स्पर्धेत राज्यातील नामवंत डॉजबॉल खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी जळगाव जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडू व जळगांवातील नागरीकांना स्पर्धेच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.