जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या वतीने आणि ओम योगाक्लास आणि सन योगाक्लासच्या सहकार्याने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान सामुहिक सुर्यनमस्कार व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या वतीने आणि ओम योगाक्लास आणि सन योगाक्लासच्या सहकार्याने शुक्रवारी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान महिला व पुरूष योगसाधक यांच्यासाठी सामुहिक सुर्यनमस्कार व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मेहरूण तलाव परिसरातील सिध्दार्थ लॉन योगा क्लास येथे होणार आहे. त्यानंतर योग शिक्षिका डॉ शरयू विसपूते योगाक्लासच्या योगसाधिका रिदमिक योगा सादर करणार आहे. शहरातील योगसाधक आणि योगशिक्षकांनी आयोजित केलेल्या शिबीराला उपस्थिती द्यावी असे आवाहन महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गुरव यांनी केले आहे.