जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव शहरातील गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे गेल्या २५ वर्षापासून गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे आयोजन रविवार रोजी दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे.
स्पर्धा ही गोदावरी संगीत महाविद्यालय भास्कर मार्केट जवळील सभागृहात बाल,किशोर व प्रौढ गट अशा तीन गटात असून प्रत्येक गटात प्रथम,व्दितीय व तृतीय अशा तीन विजेत्यास रोख पारितोषिक गोदावरी करंडक व प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक २८ सप्टेंबर २०२४ ही राहील.स्पर्धेत सहभागासाठी तसेच नियम अटी अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय भास्कर मार्केट जळगाव केंद्रप्रमुख मोबाईल नंबर ९९ २१ ९९ ६९ ७४ येथे संपर्क साधावा