जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचे औचित्य साधून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वावलंबी भारत अभियानांतर्गत उद्यमिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी १६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या संमेलनात जळगाव जिल्ह्यातील तरुणांना स्टार्टअप किंवा स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्टार्टअप इंडिया उपक्रमाची आठवण २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात केली होती. २०२२ पासून १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जात आहे. भारतीय स्टार्टअप्सच्या यशस्वी वाटचालीला अधोरेखित करण्यासाठी आणि नवउद्योजकांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरतो.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार राजूमामा भोळे या प्रमुख पाहुण्यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रमुख वक्ते आणि अतिथी कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांमध्ये योगेश उदगिरे (संचालक, ट्रिनेट्रिनी क्वाँटम प्रा. लि.), प्रा. डॉ. विकास गिते (संचालक, केसीआयआयएल इन्क्यूबेशन सेंटर), आणि प्रशांत पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव) यांचा समावेश आहे. प्रमुख अतिथींमध्ये प्रा. डॉ. विजय पाटील (प्राचार्य, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) आणि प्रा. डॉ. प्रशांत वारके (संचालक, गोदावरी आयएमआर, जळगाव) यांची उपस्थिती राहणार आहे.