जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनपा केंद्राद्वारा ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे केंद्र ४ व केंद्र ७ ची सयुक्तिक शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. यामध्ये PGI व NAS, नवोपक्रम चला, तंत्रस्नेही होवू या, जीवन कौशल्य आदी विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
शिक्षण परिषदेत जयश्री पाटील वरिष्ठ अधिव्याख्याता DIETजळगाव यांनी नवोपक्रम म्हणजे काय, नवोपक्रम हेतू, उद्दिष्टे, निकष, नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, नवोपक्रम कार्यवाहीचे टप्पे अहवाल लेखन आदी बाबी विविध उदाहरणे देवून सांगितल्या . नवोपक्रम नमुने प्रत्यक्ष दाखवून शिक्षकांना प्रशिक्षित केले.
राहुल चौधरी यांनी शिक्षणात व्हिडिओचां उपयोग व व्हिडीओ निर्मितीसाठी काईन मास्टर ॲप माध्यमातून प्रात्यक्षिक करवून घेत मार्गदर्शन केले. तसेच PGI व निर्णय क्षमता आदी विषयी शिक्षकांना माहिती देवून चर्चा करण्यात आली. तर योगेश भालेराव यांनी Inshot ॲप चा वापर करून आध्यापनास उपयुक्त व्हिडिओ कसे निर्माण करावे या विषयी माहिती दिली. यांनी मार्गदर्शन केले. सदर परिषद आयोजनात डॉ. अनिल झोपे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व दिपाली पाटील प्रशासन अधिकारी मनपा जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले. रेखा पाटील प्रणिता झांबरे मुख्याध्यापिका यांची उपस्थिती याप्रसंगी होती. शिक्षण परिषदेचे आयोजन केंद्रप्रमुख गंगाराम फेगडे यांनी केले. त्याच्या आव्हानाला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांनी उत्तम प्रतिसाद दिला. ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.