जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे दिवंगत खेळाडू मित्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाची ही सलग बारावी स्पर्धा असून शनिवार ४ जानेवारी रोजी एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज मैदानावर होणार आहे.
१९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० खेळलेले खेळाडू आपल्या दिवंगत खेळाडू मित्रांच्या आठवणीत मैदानात उतरत असतात. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री ना. रक्षा खडसे, आ. राजुमामा भोळे, आ.अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे, उद्योगपती श्रीराम खटोड, सिनिअर एक्साईज इन्स्पेक्टर मनोज चौधरी (मुंबई), खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सुरेश कलेक्शनचे मुकेश हासवाणी, मातोश्री फायनान्सचे अभिजित पाटील, गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर अनिल सोनवणे, अपर्णा ऑटोमोटिव्हचे किरण कासार, शेखर देशमुख, श्रीराम फायनान्सचे झोनल मॅनेजर श्रीपाद डांगरीकर, युनिक एक्वाचे संतोष बरडे, श्री आर्ट्सचे जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
आजी माजी खेळाडू क्रिकेट प्रेमींनी स्पर्धेला उपस्थित उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी, सचिव ऍड. केतन ढाके, कोषाध्यक्ष बाबा शिर्के, नरेश देशपांडे, युवराज वाघ, ऍड. नितीन देवराज, अनंता पाटील, विजय किनगे, हेमंत वाघ, अमोल सोले, तुषार प्रधान यांनी केले आहे. स्पर्धा आयोजनासाठी किरण चौधरी, प्रा. डॉ. हसीन तडवी, नितीन पाटील, राहुल चौधरी, अजय हंसकर, ज्ञानेश्वर कोळी,सुमित अहिरराव, केतन अहिरराव आदी परिश्रम घेत आहेत.