Home Cities भुसावळ आयुध निर्माणी खासगीकरणाच्या विरोधात छत्रपती संभाजीराजेंना निवेदन

आयुध निर्माणी खासगीकरणाच्या विरोधात छत्रपती संभाजीराजेंना निवेदन

0
43

sambhajiraje bhosle nivedan

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । आयुध निर्माणीतील खासगीकरणाच्या विरोधात आज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे एका कार्यक्रमानिमित्त जळगावहून रावेर येथे जात असतांना साकेगाव येथे थांबले. येथे त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयुध निर्माणीतील कर्मचार्‍यांनी त्यांना खासगीकरणाच्या विरोधातील निवेदन देऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले. सध्या देशभरातील आयुध निर्माणीतील कर्मचारी संपावर असून यात भुसावळ आणि वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. या पार्श्‍वभूमिवर, छत्रपती संभाजीराजे भोसले यांना हे निवेदन देण्यात आले.


Protected Content

Play sound