जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विविध सार्वजनिक कार्यक्रमांसह गुरांचा बाजार पुर्ण बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.
दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ४ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व प्रकारचे राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम यांनी पुर्णपणे बंद घालण्यात आली आहे. शासनाच्या आज १७ ऑगस्ट २०२० पासून आदेशानुसार आता जिल्हृयात सर्व गुरांचा बाजार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी गुरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन किंवा दुरध्वनी या पध्दतीने व्यवहार करण्यात मुभा दिली आहे.
या पाश्श्वभूमीवर मंगळवार १८ ऑगस्ट २०२० रोजी “पोळा” ह्या सणाच्या निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी बैल पूजा घरीच करावी. बैलांची मिरवणूक काढण्यात येवू नये. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.