रावेर प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तालुक्यातील पाल येथे अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशातील एका गावात राहणारी २० वर्षीय तरूणीची तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५) याची ओळख नाशिक येथे मजूरीसाठी आले असता त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला ०२ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा ९ सप्टेंबर रोजी देखील पिडीत तरूणीवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत तरूणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अद्याप संशयित आरोपीला अटक केलेली नाही. पुढील तपास डीवायएसी विवेक लावंड करीत आहे.