नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राणा दाम्पत्याने मुंबईत हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध झाला, पण नागपुरात मात्र शनिवारी आरती होऊनही कोणताच विरोध शिवसेनेकडून झालेला नाही यावरून राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत.
मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा दिला होता. पण मुंबईतील शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत ठिय्या दिला होता. मात्र अमरावती आणि नागपूरात मात्र याच राणा दाम्पत्याच्या नागपुरातील हनुमान चालिसा पठणाच्यावेळी मात्र येथील शिवसैनिक त्यांनी मातोश्रीवर येऊ नये म्हणून खार येथील त्यांच्या निवासस्थानापुढे हजारो शिवसैनिकांनी ठिय्या दिला होता.
तसेच राणा दापत्य विरोधात मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. पण याच राणा दाम्पत्याच्या नागपुरातील हनुमान चालिसा पठणाच्यावेळी राणा यांच्या विरोधात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. मात्र येथील शिवसैनिक गप्पच नव्हे तर फिरकले देखील नाहीत. त्यामुळे यामागे काय कारणे आहेत? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. उलट राष्ट्रवादी काँग्रेसने राणा यांच्या विरोध करण्यासाठी महागाईच्या विरोधात हनुमान चालिसा पठण केले. नागपुरात राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद मर्यदितच असली तरी राष्ट्रवादीने संधी साधून लक्ष वेढले पण एकही शिवसैनिक राणांना विरोध करण्यासाठी पुढे आलेला नाही, त्यमुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. आला नाही.