जळगाव (प्रितिनिधी)। महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांची बदली करून पुर्वीचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव भाजपा सत्ताधाऱ्यांनी मांडला. मात्र सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवतात विरोधकांना आक्रमक पवित्रा घेतला. आरोग्य अधिकारी बदलला म्हणजे शहरातील साफसफाईसाठी 75 कोटींच्या ठेक्यातील मलिदा लाटण्यासाठी आणि काही व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना काम देण्यासाठी हा बदलीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप विरोधकांना केला.
महापालिकेत महासभेचे आयोजन
त्यावर उत्तर देताना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आणि डॉ.विकास पाटील यांना चौकशीच्या अधीन राहून तसेच साफसफाईचा एकमुस्तचा ठेका दिल्यानंतर त्यांची नेमणूक करण्यात यावी अशी सूचना मांडली. गदारोळात सत्ताधारी भाजपाने या विषयाला मान्यता दिली. मंगळवारी मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात महापौर सिमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुनील गोराने आदी उपस्थित होते.
डॉ. विकास पाटील यांना केले होते बडतर्फ
विशेष महासभेत नगरसेवक सचिन पाटील यांनी सध्या जन्म-मृत्यू निबंधक म्हणून कार्यरत असलेले डॉ.विकास पाटील यांची शैक्षणिक अर्हता बीएएमएस अशी असल्याने त्यांची वर्तमान आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या जागी पदस्थापना करण्याचा ठराव मांडला. उदय पाटील यांची शैक्षणिक अर्हता अभियांत्रिकीची असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिला. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी, मनपा महासभा 7 ऑगस्ट 2017 रोजी केलेल्या ठरावानुसार डॉ.विकास पाटील हे अकार्यक्षम अधिकारी असल्याने तसेच 90 रूपये लीटर मुल्याचे फिनाईल 1300 रूपये दराने कोणतीही परवानगी न घेता खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्यावर असलेल्या आरोपामुळे त्यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी करण्याचा त्यात नमूद केले होते, असे सभागृहाला सांगितले. त्यावेळी भाजपाच्या सदस्यांची देखील त्या ठरावाला सहमती होती, असे देखील लढ्ढा यांनी निर्दशनास आणून दिले. दरम्यान, आता साफसफाईच्या एकमुस्त ठेका पध्दतीमध्ये अपात्र ठेकेदाराला पात्र करण्यासाठी उदय पाटलांच्या बदलीचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक अनंत जोशी यांनी मनपाच्या सर्व शाखेत आज त्या पदाच्या पात्रतेनुसार अधिकार्याची नेमणूक केलेली नाही. स्वच्छ भारत अभियानासाठी उदय पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. विकास पाटलांच्या कारभाराला कंटाळून मी तेव्हा त्यांचे पाय धरले होते. आता मात्र एकमुस्त पध्दतीने साफसफाईचा ठेका देताना उदय पाटलांच्या बदलीचा विषय मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ.विकास पाटील यांची नेमणूक करण्याअगोदर एकमुस्त पध्दतीने देण्यात येणार्या ठेकाचे मक्तेदार निश्चित करा. सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या अधीन राहून विकास पाटील यांची पदस्थापना करावी. तसेच उदय पाटील यांची सन्मानाने चांगल्या ठिकाणी बदली करण्यात यावी आणि यापुढे बदलीचे विषय महासभेत मांडण्यात येवू नये असे भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले.
सफाईचा ठेका एकमुस्त पध्दतीसाठी सर्वानुमते ठराव
साफसफाईचा ठेका एकमुस्त पध्दतीने द्यायच्या निविदा प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत त्यांची पुर्तता आजच्या आज करावी. आचारसंहिता लागण्यापूर्वी जी निवीदा सर्वात कमी किमतीची असेल तिला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती नगरसेविका अॅड.शुचिता हाडा यांनी मनपा आयुक्तांना केली. यासह महासभेतील विविध विषययांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
पहा– जळगाव महापालिकेच्या महासभेबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.