उपमुख्यमंत्री पवार यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज, वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री हे स्पष्टवक्ते, कर्तव्यदक्ष उत्तम प्रशासक असून शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा भाजपासोबत यावे, त्यांचे स्वागतच करू अशी खुली ऑफर भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.

नगर येथे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन अडीच वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीची अजूनही चर्चा केली जाते. आरोप प्रत्यारोपहि होतात. राज्यात अनेक नेत्यांच्या पिढ्या राजकारणात घराणेशाहीच्या मार्गाने आल्या. त्यातील अनेकांनी त्यांचे कर्तुत्व सिद्ध करीत पुढे आलेले आहेत. आणि हे पाहूनच उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावे, असे सरळ सरळ खुले आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले कि, मुख्यमंत्री मितभाषी आहेत. चुकीच्या माणसांची संगत सोडावी असा असा अप्रत्यक्षपणे टीका काही जण राजकारणात निष्क्रिय असले तर त्यामुळे समाजाचेच नुकसान होते. अशा लोकांना विरोध होणे साहजिकच आहे. डॉ सुजय याने राजकारणात येण्यासाठी आजोबांचे मार्गदर्शन घेतले.

 

Protected Content