जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबईच्या मान्यतेने व लातूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय खुल्या गटातील स्पर्धा ९ ते १२ जानेवारी रोजी लातूर येथील उदगीर येथे होत आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ठेवण्यात आलेली आहे.
जे खेळाडू जळगाव जिल्ह्यातील असतील व त्यांच्याकडे नियमानुसार जिल्ह्याचे रहिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड असेल अशा खेळाडूंनीच मुळ कागदपत्रे व आपल्या किटसह निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ अनिता कोल्हे, संचालक भास्कर पाटील व मनोज सुरवाडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहिती साठी वसीम शेख ९७६५१२०५२९, हिमाली बोरोले ७३८५६६२४०१ व राहील सर ८९९९७३९९०८ यांच्याशी संपर्क साधावा व आपली नावे सी आर एस मध्ये रजिस्टरड करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.