धुळे, विशेष प्रतिनिधी | जळगाव न.पा. तील घरकुल घोटाळा प्रकरणी आज येथील न्यायालयाने सर्व ४८ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी क्रमांक १६ सौ. पुष्पा प्रकाश पाटील यांना मात्र त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला आहे.
त्यांना जामीन मंजूर झाल्याने उर्वरित आरोपींनी प्रत्यक्ष शिक्षा सुनावली जाण्याआधीच जामिनासाठी कागदपत्रांची जमवा-जमव सुरु करून अर्ज करण्याची तयारी चालवली होती. दरम्यान न्यायमुर्तींनी अन्य कुणालाही इतर आजारांच्या कारणांनी जामीन दिला जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने कुणीही जामिनासाठी अर्ज केला नाही.