Home Cities जळगाव डॉ.आचार्य विद्यालयात रंगले ऑनलाइन ‘स्पंदन रंगतरंग'(व्हिडीओ)

डॉ.आचार्य विद्यालयात रंगले ऑनलाइन ‘स्पंदन रंगतरंग'(व्हिडीओ)

0
49

जळगाव प्रतिनिधी । डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ता स्पंदन रंगतरंग या ऑलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात प्राथमिक विभागाचे ११ व १२ जानेवारी रोजी ‘स्पंदन रंगतरंग’ ऑनलाइन च्या माध्यमातून घेण्यात आले. नृत्य, नाट्य, संगीत या कलेने नटलेला सुंदर असा आविष्कार मुलांनी सादर केला. या सोबतच वेशभूषा, वादन यांचे ही उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. इ १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. फेसबुक व युट्यूब वर कार्यक्रम live दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा जोशी व योगेश जोशी यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता शिंपी यांचे  मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास प्रमोद इसे, कविता पाटील, संध्या काटोले, प्रतिभा चौधरी, मनीषा पाटील, विजय जगताप, सुनील वाघ व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2694000494244449


Protected Content

Play sound