जळगाव प्रतिनिधी । अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेची समाजहितासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी कोवीड नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन भोई यांनी भुषविले. आजच्या बैठकीत संघटनेचा प्रचार व प्रसार करणे व समाजातील समस्या व उपाय योजना या विषयावर चर्चा झाली. समाजाला नवी दिशा मिळाली पाहिजे, विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे ठरले. चर्चेत महिलांना समान संधी मिळाली पाहिजे या विचाराने नितीन भोई यांनी ४ मे रोजी विद्यार्थी सेना व महिला सेना आघाडी स्थापन करण्याची घोषणा करून बैठकीचा समारोप करण्यात आला .
शासनाने होऊन घातलेल्या निर्णयात १ मे पासून अठरा १ ते ४५ वयोगटातील सर्वांना लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे समाजातील प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आव्हान विजय इंगळे व निलेश नेमाडे यांनी ऑनलाइन बैठकीत केले. बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तमखाने, प्रदेशाध्यक्ष नितीन भोई, राज्य संपर्क प्रमुख प्रविण भोई, राज्यमहासंघटक निलेश नेमाडे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख विजय इंगळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष विजय खेडकर, सागर भोई, विनोद भोई, शिल्पा रुयारकर, भारती भोई, सुवर्णा साठे आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.