शेअर मार्केट ट्रेंडींगच्या नावाखाली व्यापाऱ्याची लाखो रूपयांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेंडींगमध्ये जास्तीचा नफा मिळवून देतो असे सांगून रावेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याची ५ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहूल विठ्ठल पाटील वय ३५ रा. मोरगाव ता. रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरच्या दरम्यान त्यांच्या व्हॉटसॲपवर श्रृती अग्रवाल आणि दामोदर अग्रवाल असे नावे सांगणाऱ्या दोघांनी ऑनलाईन शेअरमार्केट ट्रेंडींगमधून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून ॲप डाऊन लोड करण्यास सांगून भरलेले पैशांवर त्यांनी काही परतावा दिला. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख ७९ हजार रूपये परस्पर काढून घेतले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहूल पाटील यांनी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.

Protected Content