नोकरीचे आमिष दाखवत तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निमखेडी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाईन पध्दतीने १ लाख ४८ हजार ५७३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की,  रोहन गजानन पाटील (वय-१९) रा. कल्याणी नगर, निमखेडी परिसर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याला एका अनोळखी मोबाईल नंबरच्या टेलीग्रॉम ॲपवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने पार्ट टाईम नोकरी लावण्याचे सांगितले. त्यानुसार जॉबची ऑर्डस पास करून देतो असे सांगून ऑनलाईन पध्दतीने पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने फोन-पे च्या माध्यमातून एकुण १ लाख ४८ हजार ५७३ रूपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर केले. ७ डिसेंबरपर्यंत सुरूच होता. यात पार्ट टाईम नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरूणाने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Protected Content