भडगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. दि.१२ फेब्रवारी २०१९ च्या शासन निर्णयाअन्वये महाराष्टात प्रथमच येथील आपले सरकार सेवा केंद्र तथा सेतू सुविधा केंद्र येथुन एका तासात ऑनलाईन प्रमाणपत्र तयार करून लाभार्थींना देण्यात आले.
यात शेख हासिम शेख आमिर, शाहिद शेख आमार, यांना दि.१३ रोजी वितरीत करण्यात आले. प्रमाणपत्र वितरणवेळी सुरेंद्र मोरे, रमेश सोनवणे, शरद पाटील, अलिम शाह, सुधाकर पाटील, अशोक परदेशी, सागर महाजन, किरण मोरे, दिनानाथ पाटील, ऋषीकेश पाटील, सेतू व्यवस्थापक विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.