जळगाव प्रतिनिधी | शहरातील जुना आसोदा रोडजवळील श्रीराम कॉलनी येथे एकाची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रदुम्न निवृत्ती बोरसे (वय-२३) रा. जुना असोदा रोड, श्रीराम कॉलनी जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. यांच्याकडे त्याची मालकीची (एमएच १९, बीडी ८१००) दुचाकी असून ते खाजगी नोकरीसाठी त्याचा वापर करतात. १७ जानेवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांना दुचाकी कुठेही आढळून आले नाही. शुक्रवारी 21 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परीष जाधव करीत आहेत.