जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौक येथून एका मजूराची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, निलेश रमेश सैंदाणे (वय-४४) रा. अजिंठा चौक, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ डीई ९४७१) ही चोरून नेली. त्यांनी मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेतला परंतू मोटारसायकल कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.