पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाचे वाचले प्राण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  दिवाळीची धामधूम सुरू असतांना पोलिसांच्या सतर्कतेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नांत असणाऱ्या तरुणाचा प्राण वाचला आहे.

 

पाचोरा पोलीस स्टेशनला एक महिला आली व त्यांनी सांगितले की, माझ्या मुलाने मोबाईलवर मेसेज पाठवला आहे मी आत्महत्या करीत आहे. आजीचे सर्व ऐकल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेरे व विश्वास देशमुख यांनी आपल्या काही ग्रुप वर मेसेज टाकून माहिती मागवली.   त्यांना लागलीच बिल्दी पुलाजवळ एक व्यक्ती फिरत आहे असा संदेश आला. राहुल बेहरे यांनी त्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना सूचना दिल्या. यावेळी आत्महत्या करणारा व्यक्ती हा मानसिक तणावामध्ये होता.  त्यांनी कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता नदीमध्ये उडी मारली.  त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला.  त्याचक्षणी लागलीच राहुल बेहरे व विश्वास देशमुख त्या ठिकाणी पोहचले. त्या मुलाला वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी मारणारे पप्पू भाऊसिंग मोरे, सुकलाल भिल्ल, बापू प्रल्हाद सोनवणे या तिघांनी आपल्या जीवाची पर्वा  न करता त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नदीत उडी मारून बाहेर काढले. यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करून त्याला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केले. त्याचे प्राण वाचवण्याचे खरे श्रेय राहुल बेहेरे व विश्वास देशमुख यांच्या सतर्कतेने त्या तरुणाचे प्राण वाचले. “देव तारी त्यास कोण मारी”, “पोलीस आहे आपल्या सुरक्षेचे कैवारी” असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

Protected Content