Home क्राईम अपार्टमेंटच्या पार्कींगमधून एकाची दुचाकी लांबविली

अपार्टमेंटच्या पार्कींगमधून एकाची दुचाकी लांबविली


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील साई अपार्टमेंट येथून तरुणाची २२ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. या संदर्भात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सागर गजानन बनकर वय-३३, रा.श्री साई अपार्टमेंट, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता सागर बनकर यांनी त्याची (जीजे १६ सीडी ७९४) ही त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मात्र ही दुचाकी चोरून दिली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ६ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आले आहे. दरम्यान त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी मिळाली नाही कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवार १२ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कॉन्स्टेबल रमण सुरडकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound